Hot Posts

6/recent/ticker-posts

मत मोजणी ला सुरुवात .... जनतेचा कौल कुणाला ?

 मत मोजणी ला सुरुवात .... जनतेचा कौल कुणाला ? 

             मतदान होताच लोकांचा कौल कुणाला यावर खूप चर्चा झाली. या सगळ्यावर नेत्यांचे कार्यकर्ते आमचंच सायब येणार हे दाबून सांगणारे आपण सगळ्यांनी बघितलं आहे . पण इथं कोण काय बोललं तरी जनता च ठरवते कोण निवडून येणार आणि कोण पडणार . 

             २० तारखेला मतदान झाले आणि टीव्ही चॅनेलवाल्यानी  आपल्या ठेवणीतील एक्सिट पोल बाहेर काढले .तोच कसा जनतेचा कौल आहे हे ते जीव तोडून सांगताना दिसत होते . वेगवेगळ्या पोल मधून वेगवेळी माहिती देताना सर्व न्यु चॅनेल आपल्याला दिसली . आज निकालाचा दिवस तेव्हा आज समजेल जनतेचा कौल नेमका कुणाला आहे ?

आज आठ वाजता मत मोजणी सुरु झालीय . पोस्टल मतदान त्यांनतर काही फेऱ्या हि पूर्ण होत आल्या आहे. काही तासातच सगळे चित्र स्पष्ट होताना दिसेल . यावेळी काही राजकीय समीकरणे बदलली आहे त्यामुळे काही ठिकाण च्या आर पार च्या लडाई दिसून आल्या . जोरदार प्रचार , एकनिष्ठ कार्यकर्ते  आणि काही इकडून तिकडे निवडणुकीच्या वेळी जाणारे नेते ह्या गोष्टी बदल घडवू शकतात . 

अतितटी ची लढत कागल मधेच 
आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुप चे समरजितसिंह घाटगे यांच्यातील अटीतटीची हि लढत  आहे .या मतदार संघाचा निकाल काय येईल यावर सगळ्या कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष आहे .राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत  इथे आहे . काही फेया झालेल्या आहेत . दोन्ही नेते थोड्या फार फरकाने पुढे आघाडी घेत आहेत . हि धाकधूक शेवटच्या फेरी पर्यंत राहण्याची शक्यता आहे . 



Post a Comment

0 Comments