IPO म्हणजे काय?
आजकाल शेअर मार्केटबद्दल उत्सुकता वाढत आहे. अनेक तरुण शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. अशा वेळी "IPO" हा शब्द अनेकदा ऐकायला मिळतो. परंतु अनेकांना याचा नेमका अर्थ समजत नाही. चला तर मग, आज आपण अगदी सोप्या भाषेत IPO म्हणजे काय, तो का काढला जातो, त्याचा फायदा काय, तो कसा काम करतो हे समजून घेऊया.
IPO म्हणजे काय?
IPO म्हणजे Initial Public Offering. याचा अर्थ असा की एखादी खासगी कंपनी पहिल्यांदाच सामान्य लोकांसाठी म्हणजेच 'पब्लिक' साठी आपले शेअर्स विकायला बाजारात आणते, त्याला IPO असे म्हणतात.
एखादी कंपनी जेव्हा सुरू होते, तेव्हा ती खासगी असते. सुरुवातीला ती कंपनी काही लोकांच्याच मालकीची असते – जसे की संस्थापक, भागीदार, किंवा काही खासगी गुंतवणूकदार. पण कंपनीला अधिक पैसे म्हणजेच भांडवलाची गरज असते – नवीन प्रोजेक्ट्स सुरू करण्यासाठी, विस्तारासाठी, कर्ज फेडण्यासाठी. तेव्हा कंपनी आपले काही शेअर्स बाजारात आणते आणि सामान्य लोकांकडून पैसे घेते. हा संपूर्ण प्रोसेस म्हणजेच IPO.
IPO कसा काम करतो?
-
कंपनी IPO साठी तयारी करते – सर्व कागदपत्र, आर्थिक माहिती तयार केली जाते.
-
SEBI (भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ) कडून परवानगी घेतली जाते.
-
शेअर्सची किंमत ठरवली जाते – ही किंमत कंपनी आणि बुक रनिंग लीड मॅनेजर (बँक/ब्रोकर) मिळून ठरवतात.
-
IPO बाजारात येतो – म्हणजेच तुम्ही शेअर्ससाठी अर्ज करू शकता.
-
लोक अर्ज करतात – जास्त मागणी असल्यास शेअर्सचे वाटप लकी ड्रॉसारखे होते.
-
शेअर्सचे वाटप होते आणि ते डिमॅट अकाउंटमध्ये जमा होतात.
-
कंपनी शेअर बाजारात लिस्ट होते – त्यानंतर शेअर्सची खरेदी-विक्री NSE/BSE वर सुरु होते.
IPO मध्ये गुंतवणूक का करावी?
-
कंपनीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर गुंतवणुकीचा फायदा मिळतो.
-
शेअर्सच्या लिस्टिंग दिवशी कधी कधी मोठा नफा मिळतो.
-
जर कंपनी चांगली असेल तर दीर्घकाळात चांगला परतावा मिळू शकतो.
-
स्वतःला कंपनीचा भागधारक बनवता येतो.
IPO मध्ये गुंतवणूक करताना काय लक्षात ठेवावं?
-
कंपनीची आर्थिक स्थिती तपासा.
-
तिचा व्यवसाय काय आहे, किती स्पर्धा आहे, भविष्य किती मजबूत आहे हे समजा.
-
कंपनीच्या DRHP (Draft Red Herring Prospectus) मध्ये माहिती दिली असते, ती नक्की वाचा.
-
गुंतवणूक करताना तुमचं आर्थिक उद्दिष्ट आणि जोखीम समजून घ्या.
-
फक्त नफा मिळेल या आशेवर पैसे गुंतवू नका.
भारतामधील काही मोठे IPO
-
LIC IPO (2022): हा भारतातील सर्वात मोठा IPO होता.
-
Zomato IPO (2021): खूप लोकप्रिय झाला आणि लाखो लोकांनी गुंतवणूक केली.
-
TCS, IRCTC, Paytm, Nykaa यांचे IPO सुद्धा खूप चर्चेत होते.
IPO साठी काय आवश्यक आहे?
-
Demat Account: शेअर्स मिळवण्यासाठी.
-
Trading Account: जर तुम्हाला शेअर्स विकायचे असतील तर.
-
PAN कार्ड: ओळखपत्र म्हणून आवश्यक.
-
बँक खाते: IPO मध्ये पैसे अडकवले जातात आणि शेअर्स न मिळाल्यास पैसे परत मिळतात.
IPO चे फायदे
-
चांगल्या कंपनीमध्ये सुरुवातीपासून गुंतवणूक करता येते.
-
लिस्टिंगच्या दिवशी मिळणाऱ्या नफ्याचा लाभ.
-
कमी किंमतीत शेअर्स खरेदी करता येतात.
IPO चे तोटे
-
शेअर्स न मिळण्याची शक्यता (Over Subscription).
-
लिस्टिंगच्या दिवशी शेअर किंमत कमी होण्याची शक्यता.
-
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कंपनी निवडत असाल, तर चुकीची निवड नुकसानात नेऊ शकते.
.png)
0 Comments